Checking your browser...
Touch the screen or click to continue...
Checking your browser...

Sadhana amte autobiography

Samidha

March 23, 2022
“सतीचे वाण घेणाऱ्याने चितेच्या चटक्यांची तमा बाळगू नये.”

खरोखरच कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता समिधा या नावाप्रमाणेच बाबा आमटे यांच्या जीवनाच्या यज्ञकुंडत आहुतिप्रमाणे समर्पण करणाऱ्या एका अर्धागिनी अणि लाखोंची माता असणाऱ्या साधना आमटे यांची ही जीवनकहानी. एखाद्या चित्रपटलाही लाजवेल अशी असंख्य संकटे, दुर्धर प्रसंग, संघर्ष, आपत्ती यांनी भरलेली ही एक साहसकथा वाटते.

ब्रम्हचारी होण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या बाबांनी साधनाताईना पाहून आपला निश्चय बदलला आणि तिथुन त्यांच्या वादळी सहजीवनला सुरुवात केली. पिढीजात वैभवावर पाणी सोडून बाबांनी स्वयंस्फूर्तीने पत्करलेली फकीरी, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारच्या क्षेत्रात लोकांसाठी केलेले प्रयोग, कुष्ठरोगी पुनर्वसन, आनंदवनाची निर्मिति, नागपल्ली, भामरागढ़, श्रमिक विद्यापीठ, भारत जोड़ो अभियान आशा एक एक योजना वाढतच गेल्या. एक शिखर कसबसे चढून सुटकेचा निश्वास टाकावा, तोच नवी अनोळखी शिखरे बाबांच्या सेवावृत्तीला खुनावताच राहिली.

या सगळ्याशी साधनाताई यांनी कसे जुळवून घेतले असेल?
माहेरच्या घुलेवाड्यापासून ते नर्मदा काठच्या कसरावादपर्यन्त अनेक थरारक स्मरणचित्रे या आत्मचरित्रात ताईँनी रेखाटली आहेत. ते वाचताना अंगावर काटे येतात आणि डोळ्यात आसवांचे पुर येतात. ध्येय म्हणजे दु:ख हे खरे असेल तरी या दुःखाच्या गर्भात अधिक सुक्ष्म पण उच्चतर आनंद नांदत असतो. बाबा आणि ताई याच दुर्मिळ आनंदाचे धनी ठरले. दांपत्यजीवन, सुख, आनंद याबद्दलच्या या दोघांच्याही कल्पना लोकविलक्षण आहेत. ताईंनी आपले मनोगत हृद्य शब्दांत व्यक्त केले आहे.

“आमचे जीवन कष्टायन आहे. बाबांच्या समर्पित जीवनयज्ञातील एक लहानशी समिधा हेच माझे स्थान आहे.”

स्वतःची कहानी सांगताना त्यांच्यामधे दडून बसलेली लेखिका बाहेर येते. आत्मकथेतील लेखन शैली वेधक आहे. अलंकारांनी नटलेलं निसर्गवर्णन हे या कादंबरीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे.

“जीवनाचे रणांगण तुडविणार्यांना शब्दांची याचना करावी लागत नाही. किंवा दिखावु शैलीची आराधनाही करावी लागत नाही. आपले शील जपणाऱ्यांना शैलीचे प्रसाधन मानवताही नाही.”

एका वादळाची आयुष्यभर साथ देण्याचे केलेले धाडस, आदिवासी लोकांवर केलेले निरपेक्ष प्रेम, संघर्ष, जिद्द, त्याग अशा नानाविध पैलुंनी नटलेल्या अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या दर्शनाने नतमस्तक होते.